Maharashtra Corona | राज्यात 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ओमिक्रॉनचे 85 रुग्ण आढळले

Maharashtra Corona | राज्यात 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ओमिक्रॉनचे 85 रुग्ण आढळले

| Updated on: Dec 29, 2021 | 10:49 PM

महाराष्ट्रात एकूण तब्बल 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जवळपास चार हजाराच्या जवळपास हा आकडा पोहोचल्यानं सगळेच धास्तावले आहेत. कोरोना विषाणी पुन्हा गुणाकार करु लागल्यानं आता वेळीच धोका ओळखून अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा विस्फोट झाला असून एकाच दिवसात आढळले तब्बल 87 रुग्ण आढळले आहेत. 43 प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय प्रवास तर त्यांच्या सहवासातून 4 जणांना बाधा झाली आहे. 37 जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नसून त्यांनाही लागण झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहे. मुंबई ओमिक्रॉनचे 34 रुग्ण आढळून आलेत. तर महाराष्ट्रात एकूण तब्बल 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जवळपास चार हजाराच्या जवळपास हा आकडा पोहोचल्यानं सगळेच धास्तावले आहेत. कोरोना विषाणी पुन्हा गुणाकार करु लागल्यानं आता वेळीच धोका ओळखून अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.

काय आहे आजची आकडेवारी?

  1. महाराष्ट्रातील आजचे नवे रुग्ण – 3900
  2. आज किती मृत्यू – 20
  3. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 97.61%
  4. किती रुग्ण आज बरे झाले – 1306
  5. होम क्वारंटाईनमध्ये किती – 122906
  6. ओमिक्रॉनचे किती नवे रुग्ण – 85

एकट्या मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद

दरम्यान, मुंबईत आज आढळून आलेल्या नव्या कोरोना रुग्णांनी पुन्हा धडकी भरवली आहे. कारण मुंबईत कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाली आहे, एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तम नियोजन आणि कोरोनाला रोखणारा मुंबई पॅटर्न जगभर गाजला मात्रा आता त्याच मुंबईला पुन्हा धडकी भरली आहे, कारण मुंबईसह राज्यावर, देशावर तिसऱ्या लाटेची टांगली तलवार आहे.