निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
लोकसभा निवडणूक सुरु असल्याने पैशांचं वाटप होऊ नये, यासाठी सर्व राज्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा नुकताच पार पडला. दरम्यान, कोणताही गैरप्रकार घडू नये, म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क आहे. अशातच पवई पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाकाबंदीदरम्यान पवई पोलिसांनी एका एटीएम कॅश व्हॅनची तपासणी केली आणि त्या कॅश व्हॅन गाडी मधून 4 कोटी 70 लाख रूपयांची रोकड जप्त केली आहे. यानंतर पवई पोलिसांनी ही एटीएम कॅश व्हॅन आयकर विभागाच्या ताब्यात दिली. लोकसभा निवडणूक सुरु असल्याने पैशांचं वाटप होऊ नये, यासाठी सर्व राज्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. बघा व्हिडीओ….
Published on: May 08, 2024 05:21 PM
Latest Videos