4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 July 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 July 2021

| Updated on: Jul 10, 2021 | 8:33 AM

गेल्या 24तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 200 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत करोना मुळे झालेल्या मृतांचा आकडा आता 1 लाख 25 हजार 034 इतका झाला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. त्यासोबतच, रेल्वे प्रवास, होम आयसोलेशन, क्वारंटाईनचा कालावधी या बाबतीत देखील सूट मिळावी, अशी मागणी केली जात असताना दुसरीकडे राज्यातील मृतांचा आकडा अद्याप नियंत्रणात येताना दिसत नाही. गेल्या 24तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 200 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत करोना मुळे झालेल्या मृतांचा आकडा आता 1 लाख 25 हजार 034 इतका झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 15 हजार 599 मृत्यू हे एकट्या मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये झाले आहेत.