4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 September 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 September 2021

| Updated on: Sep 10, 2021 | 8:08 AM

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमन होईल. आज भाविक आपल्या प्रिय गणेशाला घरी आणतील आणि 10 दिवस त्यांची मनोभावे पूजा आणि सेवा करतील.

आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्यासाठी गणेशोत्सवात फुलांची मोठी मागणी असते. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अगदी पहाटेपासून नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. फुल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होणार हे माहिती असूनही इथे कुठल्याही प्रकारच्या पोलीस बंदोबस्त दिसला नाही किंबहुना महापालिकेचे कर्मचारी देखील दिसले नाही.

आजपासून पुढचे दहा दिवस गणेशोत्सवाची धूम असणार आहे. पण या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. अशावेळी शासनाने घालून दिलेले कोरोनाचे सगळे नियम पाळून राज्यातील नागरिकांना गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. पण लोकांनी नियमांकडे साफ दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. पहाटे पाच पासून नागरिकांनी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली. अनेक लोकांनी मास्क लावलेला नाहीये. तर नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं देखील पालन करत नाही.

Published on: Sep 10, 2021 08:08 AM