4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 11 September 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर स्वागत करू, असं नारायण राणे म्हणाले. राणेंनी अवघ्या तीनच दिवसात पलटी खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान केल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी नरमाईचा सूर आळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर स्वागत करू, असं नारायण राणे म्हणाले. राणेंनी अवघ्या तीनच दिवसात पलटी खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नारायण राणे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हे विधान केलं. विकासाची प्रत्येक गोष्ट माझं स्वप्नच आहे. सिंधुदुर्गात विमानतळ मी स्वत: बांधलं आहे. मी मंत्री असताना बांधून पूर्ण केलं आहे. हे विमानतळ 9 ऑक्टोबरला सुरू होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. श्रेय कसलं? जे कोण बोलतंय त्यांचं सिंधुदुर्गाच्या विकासात एक टक्क्याचं श्रेय नाही. काही नाही. विमानतळ बांधून मी पूर्ण केलंय. श्रेयाचा प्रश्न येतो कुठे, असं सांगतानाच मुख्यमंत्री आले तर त्यांचं स्वागत करू, असं राणे म्हणाले.