4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 12 July 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 12 July 2021

| Updated on: Jul 12, 2021 | 8:37 AM

पंकजा यांच्या 49 समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी ही बैठक होणार असल्याचं भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे पंकजा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

या दिल्ली भेटीत पंकजा मुंडे या पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्याकडे मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

पंकजा यांच्या 49 समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी ही बैठक होणार असल्याचं भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे पंकजा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. याच कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज असून जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण 11 तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या 11 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर ही संख्या आता 25 वर पोहोचली आहे.