4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 13 September 2021
गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही 80 ते 100 जागा लढवू, असं सांगतानाच गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करू शकतो.
महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शिवसेना गोवा, उत्तर प्रदेशातही मविआचा प्रयोग करणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तशी घोषणाच केली. तसेच गोव्यात 20-21 तर उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 80 ते 100 जागा लढवणार असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही 80 ते 100 जागा लढवू, असं सांगतानाच गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करू शकतो. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो. उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं राऊत यांनी सांगितलं. गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.