4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 14 August 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 14 August 2021

| Updated on: Aug 14, 2021 | 8:28 AM

पर्यावरणप्रेमींनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम 2021 जारी केला आहे. याअंतर्गत वरील निर्णय घेण्यात आला आहे. 

देशातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी (Ban on Single Use Plastic) घालण्यात आली आहे. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची(Single Use Plastic) निर्मिती, विक्री, साठवण तसेच वाहूतक करण्यास बंदी असेल. पर्यावरणप्रेमींनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम 2021 जारी केला आहे. याअंतर्गत वरील निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या अधिनियमानुसार 1 जुलै 2022 पासून पॉलिस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल. यामध्ये प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. झेंडा, फुगे, आईसक्रीम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल यांचे उत्पान करण्यात बंदी असेल. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, स्वीट बॉक्स, इन्विटेशन कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवरील प्लास्टिकचे रॅप अशा वस्तूंची निर्मिती करण्यासही बंदी असेल.

Published on: Aug 14, 2021 08:28 AM