4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 14 September 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 14 September 2021

| Updated on: Sep 14, 2021 | 8:05 AM

या प्रकरणी  मंगळवारी ईडीमध्ये रितसर तक्रार नोंदवणार असून परवा केंद्रातील विविध तीन यंत्रणांना याबाबतचे 2700 पानांचे पुरावे देणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज नवा बॉम्बगोळा टाकला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी  मंगळवारी ईडीमध्ये रितसर तक्रार नोंदवणार असून परवा केंद्रातील विविध तीन यंत्रणांना याबाबतचे 2700 पानांचे पुरावे देणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.

सोमवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ते दोन नेते कोण? असा सवाल केला जात होता. त्यावरचा सस्पेन्स आज उठला. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा भ्रष्टाचार बाहेर काढला. तर शिवसेनेच्या मंत्र्याचा भ्रष्टाचार नंतर जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं.

हसन मुश्रीफ आणि परिवारांनी सरसेनानी संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहे. हे मी जबाबदारीने सांगत आहे. याबाबत उद्या मी मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. 2700 पानांचे पुरावे देणार आहे. परवा दिल्लीला फायनान्स मिनिस्ट्री, ईडी, कंपनी मंत्रालय यांच्याकडेही हे सर्व पुरावे देणार आहे. ठाकरे सरकारची डर्टी इलेव्हन घोटाळ्यात राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे दोन मंत्र्याच्या फाईल तयार होत्या. आज एनसीपीच्या मंत्र्यांचा घोटाळा उघड केला. कालांतराने दुसऱ्या मंत्र्याचा घोटाळा उघड करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

Published on: Sep 14, 2021 08:05 AM