4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 21 July 2021
राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे या दोघांना मुंबई सत्र न्यायालयानं 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
अश्लील चित्रपट प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांचे पाय अधिक खोलात गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे या दोघांना मुंबई सत्र न्यायालयानं 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
फेब्रुवारी 2021 मध्ये मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासात अस निष्पन्न झाल होत की नवोदित महिला कलाकारांना वेबसिरीज किंवा मालिकेत काम मिळवून देतो असे सांगून अमिश दाखवून बोलावलं जायचं आणि त्यामध्ये अश्लील व्हिडिओ शूट केले जायच. अश्या काही तक्रारी क्राईम ब्रांचकडे प्राप्त झालेल्या होत्या त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Published on: Jul 21, 2021 08:33 AM
Latest Videos