4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 21 October 2021
‘एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी घोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना’, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारलाय. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून सुरु असलेल्या कारवाईचंही त्यांनी जोरदार समर्थन केलं आहे.
‘एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी घोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना’, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय.
त्याचबरोबर ‘इथे लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिलंय, लोकांनीच दिलंय ना. यावर काम करावं की नाही करावं, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा हे आपल्यालाच ठरवायचं आहे. यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते’, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी एनसीबीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.