4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 25 July 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 25 July 2021

| Updated on: Jul 25, 2021 | 8:24 AM

मुख्यमंत्री आज चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील कोकणात येणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत.

कोकणात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे महाड तालुक्यातील तळीये गाव दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 43 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. तर अजून 45 लोक बेपत्ता असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावातील विदारक स्थितीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री आज चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील कोकणात येणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत.

Published on: Jul 25, 2021 08:24 AM