4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM
कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉन विषाणूमुळे जगाची झोप उडालीय. संसर्गदर जास्त असल्यामुळे वेगवेगवेगळ्या देशातील वैज्ञानिक आणि आरोग्य विभाग या विषाणूचा अभ्यास करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशात खबरदारी म्हणून अनेक प्रतिबंधात्मक नियम लागू केले जातायत. महाराष्ट्र सरकारने तर आंतरराज्यीय विमान उड्डाणांविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉन विषाणूमुळे जगाची झोप उडालीय. संसर्गदर जास्त असल्यामुळे वेगवेगवेगळ्या देशातील वैज्ञानिक आणि आरोग्य विभाग या विषाणूचा अभ्यास करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशात खबरदारी म्हणून अनेक प्रतिबंधात्मक नियम लागू केले जातायत. महाराष्ट्र सरकारने तर आंतरराज्यीय विमान उड्डाणांविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. विमानतळावर डोमॅस्टिक पॅसेंजरकरीता 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणंबद्दलही मोठा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणवरील बंदी कायम ठेवली आहे. येत्या 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे सुरू होणार होती. मात्र सध्या ओमिक्रॉन विषाणूमुळे सरकारने 15 डिसेंबरनंतरही आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावरील बंदी कायम ठेवली आहे.