4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 5 September 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 5 September 2021

| Updated on: Sep 05, 2021 | 8:23 AM

Rain | राज्यात येत्या 4 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

बई शहर आणि उपनगरांत शनिवारी रिमझिम पाऊस झाला. राज्याच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली. येत्या 48 तासांत उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज रविवारी कोकणातील दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

रविवारसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

राज्यात येत्या 4 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.