4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 6 October 2021
लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली अक्षरश: चिरडलं गेलं. त्याचा एक व्हिडीओही अनेक नेत्यांनी ट्वीट केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. राजधारी दिल्लीत ही भेट झाली. यावेळी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली अक्षरश: चिरडलं गेलं. त्याचा एक व्हिडीओही अनेक नेत्यांनी ट्वीट केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. राजधारी दिल्लीत ही भेट झाली. यावेळी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. (discussion between ShivSena MP Sanjay Raut and Congress leader Rahul Gandhi)
राहुल गांधी यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येक गोष्टी मी सांगू शकत नाही. काही गोष्टी आमच्या दोघांमध्ये राहू द्या, असं संजय राऊत म्हणाले. लखीमपूरला विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ जाणार का? असा सवाल पत्रकारांनी संजय राऊतांना विचारला. त्यावेळी याबाबतही चर्चा झाली आहे. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल, असं राऊत म्हणाले. देशात लोकशाही उरली आहे का? देशात जे काही सुरु आहे त्यावर आम्ही चर्चा केली. लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. राहुल गांधींसोबत राजकीय चर्चा झाली. आता विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मतही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलंय.