4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 7 November 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 7 November 2021

| Updated on: Nov 07, 2021 | 8:36 AM

के पी गोसावीच्या या सेल्फी फोटोमुळेच संपूर्ण गेम फसल्याचे सुनील पाटील के पी गोसावीला बोलत होते, असा गौप्यस्फोट विजय पगारेंनी केला आहे. ही जी डील झाली ती पूजा मॅडम, सॅम डिसुझा, किरण गोसावी, मनीष भानुशाली आणि मास्टरमाइंड सुनील पाटील यांच्यात झाली आहे, असेही पगारेंनी सांगितले.

क्रूझ ड्रग पार्टीवर 2 ऑक्टोबर रोजी कारवाई करत आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यापैकी एका फोटोत आर्यन एका कथित एनसीबी अधिकाऱ्यासोबत दिसत होता. तो कथित अधिकारी के पी गोसावी होता. के पी गोसावीच्या या सेल्फी फोटोमुळेच संपूर्ण गेम फसल्याचे सुनील पाटील के पी गोसावीला बोलत होते, असा गौप्यस्फोट विजय पगारेंनी केला आहे. ही जी डील झाली ती पूजा मॅडम, सॅम डिसुझा, किरण गोसावी, मनीष भानुशाली आणि मास्टरमाइंड सुनील पाटील यांच्यात झाली आहे, असेही पगारेंनी सांगितले.

पूजा मॅडम, सॅम डिसुझा, किरण गोसावी, मनीष भानुशाली आणि मास्टरमाइंड सुनील पाटील यांच्यात शंभर टक्के डील झाली आहे. पण शाहरुखकडून पैसे आले की नाही मला माहीत नाही. मी डोळ्याने पाहिले नाही. केवळ कानाने ऐकलं आहे. केपी गोसावीला 50 लाख मिळाले होते. डील शंभर टक्के झाली होती. पैसे हवाला झाले होते. हवाला झालेले पैसे परत गेले असंही सुनील म्हणाला होता. पण 50 लाख अॅडव्हान्स मिळाले होते. साडे सतरा कोटी हवाला झाले होते. पण ते परत गेले. हे वाक्य सुनील पाटील मला बोलला. सॅम डिसुझाचा पैशासाठी सुनील पाटीलला फोन येत होता. मेहूलही त्यांच्याशी बोलत होता. त्यांचं संभाषण व्हाईस कॉलवरूनच सुरू होतं. ते साध्या कॉलवरून कधी बोलले नाही, असे पगारेंनी स्पष्ट केले.

Published on: Nov 07, 2021 08:36 AM