4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 26 October 2021
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.
आर्यन खानच्या वतीने जामीन प्रकरणात मी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहीन, अशी माहिती भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिली.
अलिकडेच शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात गेला होता. त्यानंतर काल आई गौरी खानही आर्यनला भेटायला आर्थर रोड जेलमध्ये गेली होती.
Latest Videos