4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 9 September 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 9 September 2021

| Updated on: Sep 09, 2021 | 7:49 AM

गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकासाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी उडाल्याची माहिती मिळतेय. म्हाडा असताना खासगी विकास का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आधीच पत्रा चाळ प्रकल्प रखडला आहे. त्यात या प्रकल्पाची भर नको अशी भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्याची माहिती मिळतेय.

गोरेगावमधील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास केल्यावर पुनर्वसन घटकाव्यतिरिक्त साधारणपणे 33,000 गाळे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होवू शकतील. त्यामुळे यास “विशेष प्रकल्पाचा दर्जा” देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या निर्णयावरुन आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती मिळतेय. मोतीलाल नगर पुनर्विकास खासगी विकासकाला देण्यास शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा विरोध होता, असं कळतंय.

गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकासाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी उडाल्याची माहिती मिळतेय. म्हाडा असताना खासगी विकास का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आधीच पत्रा चाळ प्रकल्प रखडला आहे. त्यात या प्रकल्पाची भर नको अशी भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्याची माहिती मिळतेय. तरीही मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प खासगी विकासकाला देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आला आहे.

Published on: Sep 09, 2021 07:49 AM