4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 14 October 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 14 October 2021

| Updated on: Oct 14, 2021 | 10:07 AM

रोजचा दिवस कसा ढकलायचा, पोटाची खळगी कशी भरायची, आधीच ‘कोरोनाचा मार’ त्यात हा दरवाढीचा भडिमार कसा सहन करायचा या विवंचनेत सामान्य माणूस आहे. सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खात आहे. आकड्यांच्या रेघोट्या मारीत ‘अच्छे दिन आले हो’चा उद्घोष करीत आहे.

भरमसाठ दरवाढ झाल्याने जगायचं कसं, या विवंचनेत सामान्य माणूस आहे. सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खात आहे. त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएफएमने केंद्राला एक जागर दाखवले आहे. 2022 मध्ये विकास दरात भारत जगाला मागे टाकणार, असं ते गाजर… पण हीदेखील एक प्रकारची आकडेबाजीच आहे. पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, पण निदान महागाईची जुमलेबाजी तरी करु नका, अशा शब्दात आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आलाय