VIDEO : z4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 15 August 2022

VIDEO : z4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 15 August 2022

| Updated on: Aug 15, 2022 | 1:56 PM

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या आल्या आहेत. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँड लाईनवर अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्या अज्ञात व्यक्तीने फोन करून अंबानी कुटुंबाला धमकी दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या आल्या आहेत. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँड लाईनवर अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्या अज्ञात व्यक्तीने फोन करून अंबानी कुटुंबाला धमकी दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. गुगलवरील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या त्याच क्रमांकावर हा धमकीचा कॉल आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 3 ते 4 वेळा फोन करून धमक्या देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या डीबी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

Published on: Aug 15, 2022 01:56 PM