VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 21 March 2022
कर्नाटक हायकोर्टाने हिजाब बंदी योग्य ठरवलेली आहे. शाळेमधील ड्रेस कोडबाबतचा अधिकार हा शाळा प्रशासनाचाच असल्याचं कर्नाटक हायकोर्टाने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परिस्थिती अशीच राहिली आणि असेच जर हातावर हात देऊन आपण उभे राहिलो तर 30 वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशाप्रमाणे हिजाब, बुरखा घालावा लागेल, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे.
कर्नाटक हायकोर्टाने हिजाब बंदी योग्य ठरवलेली आहे. शाळेमधील ड्रेस कोडबाबतचा अधिकार हा शाळा प्रशासनाचाच असल्याचं कर्नाटक हायकोर्टाने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परिस्थिती अशीच राहिली आणि असेच जर हातावर हात देऊन आपण उभे राहिलो तर 30 वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशाप्रमाणे हिजाब, बुरखा घालावा लागेल, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. मोर्शी येथे ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला. तुळजापूरची भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली.अयोध्या, मथुरा व काशी विश्वनाथ येथे चित्र वेगळे आहे. कारण जिथं शिवाजी महाराज नव्हते, तिथं मंदिराच्या बाजूला मशीद तयार झाली, असं सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मोठ्या ताकदीने करावा, असं आवाहन बोंडे यांनी केलं.
Latest Videos