VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 21 May 2022
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा बांधकामांसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकाम आढळून आल्याने त्यांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. नुकतीच त्यांना दुसरी अनधिकृत बांधकामा संदर्भात एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 7 ते 15 दिवसांच्या आत केलेलं बांधकाम पाडा अन्यथा पालिका कारवाई करेल असं म्हटलं आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा बांधकामांसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकाम आढळून आल्याने त्यांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. नुकतीच त्यांना दुसरी अनधिकृत बांधकामा संदर्भात एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 7 ते 15 दिवसांच्या आत केलेलं बांधकाम पाडा अन्यथा पालिका कारवाई करेल असं म्हटलं आहे. महापालिकेने दिलेल्या नोटीशीनंतर राणा दाम्पत्य काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खार येथे घर असलेल्या राणा दाम्पत्याच्या इमारतीचा अधिकृत आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्या व्यतिरिक्त बांधकाम का केलं ? असा प्रश्न नोटिशीतून पालिकेतील अधिकाऱ्यांनी विचारला आहे. तसेच संबंधित केलेले अनधिकृत बांधृकाम 7 ते 15 दिवसांच्या आत पाडा, अन्यथा आम्ही कारवाई करू असा अल्टीमेटम देण्यात आला आहे.