VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 21 September 2021
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित आहे, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित आहे, असे फडणवीस म्हणाले. अनंत गीते यांनी दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही, असं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. गीते यांच्या या विधानाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हवा दिली. त्यानंतर आता फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गीतेंनी केलेलं वक्तव्य ही सत्य परिस्थिती आहे. अशी अनैसर्गिक आघाडी कधी चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
Latest Videos