VIDEO | Headline | शरद पवारांची बैठक विरोधी पक्षांची नाही : संजय राऊत

VIDEO | Headline | शरद पवारांची बैठक विरोधी पक्षांची नाही : संजय राऊत

| Updated on: Jun 22, 2021 | 3:01 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. मात्र, ही बैठक राष्ट्रमंचची आहे. तिसऱ्या आघाडीची नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक असली तरीही या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. मात्र, ही बैठक राष्ट्रमंचची आहे. तिसऱ्या आघाडीची नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक असली तरीही या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रमंचचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4 वाजता होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रमंचचे नेते यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्यासह 15 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या संसदीय बोर्डाची बैठक होत आहे.