VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 22 May 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 22 May 2022

| Updated on: May 22, 2022 | 1:25 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आणि यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. उत्तर प्रदेशसह देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे आणि विशेषत: राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे लागलं होतं. अयोध्येला जाण्यासाठी मनसेकडून काही ट्रेन देखील बुक करण्यात आल्या होत्या. मात्र, ही तयारी सुरू असतानाच भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आणि यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. उत्तर प्रदेशसह देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे आणि विशेषत: राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे लागलं होतं. अयोध्येला जाण्यासाठी मनसेकडून काही ट्रेन देखील बुक करण्यात आल्या होत्या. मात्र, ही तयारी सुरू असतानाच भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती केली. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही, तोपर्यंत राज यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला. सभा, संमेलन आणि बाईक रॅली काढून त्यांनी राज ठाकरे यांना जोरदार विरोध केला होता.