VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 23 March 2022
आम्ही आधीच नमूद केल्याप्रमाणे, आमच्याकडून अनवधानाने मुलीच्या संदर्भातलं वक्तव्य हे जितेंद्र आव्हाडांच्या संदर्भात गेलं. पण मंत्री महोदयांनी आमची चूक लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित बातमी आम्ही मागे घेतली आहे. सर्व सोशल माध्यमातून ती हटवण्यात आलीय. त्यानंतर सुधारीत बातमी आम्ही पुन्हा देत आहोत. आव्हाडांनी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय.
ईडीने उद्या माझ्या मुलीला नुसतं बोलावलं, तरी ती आत्महत्या करेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणल्यानंतर ‘न्यूज 18 लोकमत’ या वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाडांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं होतं. मात्र ‘टीव्ही9 मराठी’च्या वेबसाईटवर याबाबतचे वृत्त प्रकाशित करताना अनवधानाने ‘मी आत्महत्या करेन’ असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचा उल्लेख झाला होता.
Latest Videos