VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 27 February 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 27 February 2022

| Updated on: Feb 27, 2022 | 1:42 PM

शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. मला वाटतं केवळ महाराष्ट्रातच इन्कम आहे आणि टॅक्स आहे. मुंबई सर्वाधिक टॅक्स केंद्र सरकारला देते.

शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. मला वाटतं केवळ महाराष्ट्रातच इन्कम आहे आणि टॅक्स आहे. मुंबई सर्वाधिक टॅक्स केंद्र सरकारला देते. जिथे जिथे भाजपची सत्ता आहे, त्या राज्यात इन्कमही नाही आणि टॅक्सही नाहीये. या राज्यांमध्ये सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल करतानाच महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यामुळे सेंट्रल एजन्सीला केवळ महाराष्ट्रातच काम आहे किंवा पश्चिम बंगालमध्येच काम आहे. बाकी संपूर्ण देश ओस पडला आहे. आम्ही या सर्व गोष्टी नमूद करत आहोत. जनताही पाहत आहे. जे शोधायचं आहे. शोधू द्या. ढुंढते रह जाओगे, असं संजय राऊत म्हणाले.