VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 28 May 2022
तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, असं बेताल विधान करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तोफ डागली आहे. त्यांच्यावर संस्कारच तो आहे. त्यांची ती जी भाषा आहे, त्याला आम्ही विकृती म्हणतो. ते त्यांचं वैफल्य आहे. 2024 साली कोण मसणात जाईल ते कळेलच, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.
तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, असं बेताल विधान करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तोफ डागली आहे. त्यांच्यावर संस्कारच तो आहे. त्यांची ती जी भाषा आहे, त्याला आम्ही विकृती म्हणतो. ते त्यांचं वैफल्य आहे. 2024 साली कोण मसणात जाईल ते कळेलच, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत कोल्हापुरात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. राऊत यांनी हा दौरा राजकीय नसून संघटनात्मक बांधणीसाठीचा असल्याचं स्पष्ट केलं.
Published on: May 28, 2022 02:20 PM
Latest Videos