VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 12 October 2021
नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. मालेगाव दोन्ही लाटेमध्ये हॉटस्पॉट ठरले. हे पाहता राज्य सरकारने लसीकरण वेगात राबवले. नाशिक जिल्ह्यातही लसीकरणाने मोठे उद्दीष्ट साध्य केले. मात्र, हे लसीकरण नेमके कशा पद्धतीने झाले याच्या एकेक सुरूस कथा आता बाहेर येत आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. मालेगाव दोन्ही लाटेमध्ये हॉटस्पॉट ठरले. हे पाहता राज्य सरकारने लसीकरण वेगात राबवले. नाशिक जिल्ह्यातही लसीकरणाने मोठे उद्दीष्ट साध्य केले. मात्र, हे लसीकरण नेमके कशा पद्धतीने झाले याच्या एकेक सुरूस कथा आता बाहेर येत आहेत. लसीकरणासाठी अनेक ठिकाणी शाळेत केंद्र थाटण्यात आले होते. शिक्षकांना या कामी नियुक्त करण्यात आले होते. मालेगावमधल्या संगमेश्वर वॉर्डात जुलै महिन्यात लसीकरण मोहीम राबवली. यात 2 जुलै 2021 रोजी कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांनी 13 जणांना कोविड लस न देताच प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून याप्रकरणी दहा शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
Latest Videos