VIDEO | 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 2 May 2022
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम दिला असून येत्या 04 मे पर्यंत ही कृती झाली पाहिजे, असा इशारा दिला आहे. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांना, महाराष्ट्र सरकारला हा इशारा दिला आहे, त्यामुळे मुस्लिम समाज यावर प्रतिक्रिया देणार नाही. पण राज ठाकरे यांनी जी काही भाषा वापरली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम दिला असून येत्या 04 मे पर्यंत ही कृती झाली पाहिजे, असा इशारा दिला आहे. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांना, महाराष्ट्र सरकारला हा इशारा दिला आहे, त्यामुळे मुस्लिम समाज यावर प्रतिक्रिया देणार नाही. पण राज ठाकरे यांनी जी काही भाषा वापरली आहे, त्याचा अर्थ सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे, असंही खासदार इम्तियाज जलील यांनी आवर्जून सांगितलं. जे काय व्हायचं आहे ते एकदा होऊन जाऊ दे… असं राज ठाकरे म्हणाले, याचा अर्थ काय? आम्हालाही जीभ आहे. आम्हीही बोलू शकतो. पण बोलणार नाही, कारण यातून समस्या सुटणार नाहीत.
Latest Videos