VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 25 January 2022
दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावरील कार्टुन हे महाजनांवर व्यक्तिगत टीका करणारं नव्हतं. त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारं हे ट्विट होतं. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते कार्टुन पोस्ट केलं होतं. हे ट्विट डिलीट केलं असलं तरी जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलं आहे.
दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावरील कार्टुन हे महाजनांवर व्यक्तिगत टीका करणारं नव्हतं. त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारं हे ट्विट होतं. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते कार्टुन पोस्ट केलं होतं. हे ट्विट डिलीट केलं असलं तरी जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलं आहे. लोकांनी पोहोचवलं आहे, असं सांगतानाच पूनम महाजन सध्या कुठे आहेत? त्यांचं भाजपशी काय नातं आहे?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. काल संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं. त्याला भाजप नेत्या पूनम महाजन यांनी आक्षेप घेत संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते.
Latest Videos