VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 25 July 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी 12.20 वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी 2.40 वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होतील. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर कोकण दौऱ्यावर आले असून त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे.
Latest Videos