VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 26 July 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 26 July 2021

| Updated on: Jul 26, 2021 | 11:35 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आल्याने अजित पवार यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आल्याने अजित पवार यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. अजित पवार आज सकाळी 9 वाजता कोल्हापूर विमानतळावर येणार होते. त्यानंतर सव्वा नऊन वाजता ते शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देणार होते.

तिथून ते शिवाजी पूल पूरग्रस्त परिसराची पाहणी करणार होते. नंतर सव्वा दहा वाजता शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्याती पूरग्रस्त परिस्थितीचा आढाव घेणार होते. त्यानंतर 11.30 वाजता ते हेलिकॉप्टरने शिरोळकडे जाणार होते. 12 वाजता शिरोळमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करणार होते.