Headline | 12 PM | एमिरेट्स एअरलाईन्सची भारतात पुन्हा उड्डाणं सुरु
शिवसेनेच्या वर्धापनदिनी कुडाळमध्ये नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर झालेल्या राड्यानंतर आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यासह शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या वर्धापनदिनी कुडाळमध्ये नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर झालेल्या राड्यानंतर आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यासह शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदा जमाव करून तसेच कोरोना काळात लोकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेच्या वीस ते पंचवीस जणांवर तर भाजपच्या 10 ते 12 जणांवर कुडाळ पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर भादंवी कलम 188,143 अन्वये गुन्हे दाखल असल्याचे समजते आहे.
Latest Videos