VIDEO : Headline | 12 PM | नवी मुंबईत भूमिपुत्रांचा एल्गार

VIDEO : Headline | 12 PM | नवी मुंबईत भूमिपुत्रांचा एल्गार

| Updated on: Jun 24, 2021 | 1:27 PM

पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे.

पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी केदार असोसिएटसनं नोटिसा दिल्याचा आरोप केला होता.

कारवाईचं काम पुणे महापालिकेकडून प्रस्तावित नाल्याचं अतिक्रमण काढण्याचं काम सुरु आहे. 26 मार्च 2021 रोजी सर्वांना नोटीस दिली होती. त्या नोटीसचे फ्लेक्स त्या ठिकाणी लावले होते. पेपरमध्येही जाहिरात पब्लिश करण्यात आलं होतं. प्रस्तावित नाला आहे, जो महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सुरु आहे. 300-400 झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पाणी शिरतं.