VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 13 June 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 13 June 2022

| Updated on: Jun 13, 2022 | 1:16 PM

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेनं राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना विरुद्ध संभाजीराजे असं चित्र आता राज्यामध्ये बघायला मिळते आहे. शिवसेनेने संभाजीराजे यांच्यासमोर शिवबंधन बांधण्याची अट ठेवली आणि सगळे काही निघून गेले. यातच आता  दुसऱ्या दिवशी नवी मुंबईमध्ये संभाजीराजे यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केलीये. यावेळी पोस्टरमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेनं राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना विरुद्ध संभाजीराजे असं चित्र आता राज्यामध्ये बघायला मिळते आहे. शिवसेनेने संभाजीराजे यांच्यासमोर शिवबंधन बांधण्याची अट ठेवली आणि सगळे काही निघून गेले. यातच आता  दुसऱ्या दिवशी नवी मुंबईमध्ये संभाजीराजे यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केलीये. यावेळी पोस्टरमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार, असे पोस्टरवर म्हटल्याचे दिसून येते आहे. राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे 2024 बाकी है, असे म्हणत थेट इशाराच पोस्टरमधून देण्यात आला आहे. बॅनरवरील मजकूर सर्वांचे लक्ष आकर्षित करत असून पुन्हा एकदा संभाजीराजे विरुद्ध शिवसेना वाद निर्माण झाल्याचं दिसतंय.

Published on: Jun 13, 2022 01:16 PM