VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 2 PM | 6 July 2021
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवली होती. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.
Latest Videos