4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 11 October 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 11 October 2021

| Updated on: Oct 11, 2021 | 4:00 PM

महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. आज सकाळपासूनच महाराष्ट्र बंदचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे.

महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. आज सकाळपासूनच महाराष्ट्र बंदचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या अगदीच नगण्य आहे. भाजी मार्केट वगळता इतरत्र गर्दीही दिसत नाहीय. मुंबई लोकलही सुरळीतपणे सुरु आहे. याउलट बेस्ट बस, पुणे पीएमपीएमएल आणि खाजगी वाहतूकही बंद आहे. त्याचवेळी राज्यात अत्यावश्यक सेवेवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.

या महाराष्ट्र बंदला पुणे-मुंबई-ठाण्याच्या व्यापाऱ्यांनी रविवारी दुपारपर्यंत विरोध केला होता. व्यापाऱ्यांनी सोमवारी दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबई व्यापारी संघटनेचे विरेन शहा यांनी एक पाऊल मागे घेत सोमवारी दुपारी 4 पर्यंत दुकाने बंद ठेवणार असल्याची घोषणा केली.