4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 14 August 2021
संजय राठोड यांनी आपल्याला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून धमक्या आल्याचे म्हटले होते. त्यामुळे याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सायबर सेलचीही मदत घेतली जाणार आहे. महिलेनं केलेली तक्रार आणि संजय राठोड यांना मोबाईलवर आलेल्या एसएमएसची चौकशी होईल. त्यामुळे आता या चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. संबंधित महिलेल्या आरोपांनंतर संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. यावेळी त्यांनी माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी कोणीतरी जाणुनबुजून मला या सगळ्यामध्ये गोवत असल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे तर संजय राठोड यांनी स्वत:हून याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.