4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 17 September 2021
उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादेत केलेल्या विधानावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच नापसंती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे नापसंती व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती मिळतेय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला. महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादेत केलेल्या विधानावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच नापसंती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे नापसंती व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती मिळतेय. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असताना अशा वक्तव्यांची गरज काय? असा सवाल पवार यांनी केल्याचं सूत्रांकडून कळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाले आहेत.