4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 August 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 August 2021

| Updated on: Aug 19, 2021 | 3:51 PM

तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलवर कब्जा केल्यानंतर लगेचच देश सोडून पळून जाणाऱ्या राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी बुधवारी (18 ऑगस्ट) संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलवर कब्जा केल्यानंतर लगेचच देश सोडून पळून जाणाऱ्या राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी बुधवारी (18 ऑगस्ट) संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. देश सोडल्यानंतरचा नागरिकांशी हा त्यांचा पहिला संवाद आहे. यात त्यांनी पैसे घेऊन देश सोडल्याच्या आरोपांचं खंडन करत ते खोटं असल्याचं म्हटलं. पैशांनी भरलेल्या 4 कार आणि हेलिकॉप्टरसोबत देश सोडल्याची माहिती खरी नाही. हे सर्व विनाधार आहे. काबुलमध्ये रक्तपात होऊ नये म्हणून मी देश सोडलाय. पैशांचं सोडा, मी अंगावरील कपड्यांसह देश सोडलाय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता, असं मत अशरफ गनी यांनी व्यक्त केलं.