4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 November 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 November 2021

| Updated on: Nov 19, 2021 | 4:05 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल, शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो असू, त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत, असं म्हणत पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची भूमिका जाहीर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल, शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो असू, त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत, असं म्हणत पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची भूमिका जाहीर केली. शेतकऱ्यांनी आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय कारण सांगितलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता देशवासियांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. कायद्याच्या ज्या तरतुदीवर शेतकऱ्यांचा आक्षेप होता, तो बदलायला आम्ही तयार होतो. आम्ही दोन वर्षासाठी कायदे तहकूब करण्याचाही निर्णय घेतला. मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो, की आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. आम्ही दिव्यासारखे प्रकाशमान सत्य काही शेतकऱ्यांना समजवू शकलो नाही. आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे रद्द करण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, असं मोदी म्हणाले. शेतकऱ्यांनी आता आंदोलन करू नये. त्यांनी आपआपल्या घरी जावं. शेतावर काम करावं, अशी विनंतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाअखेरीस केली.