4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 24 September 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 24 September 2021

| Updated on: Sep 24, 2021 | 3:56 PM

फिल्मी स्टाईल हत्याकांडाने दिल्ली हादरली आहे. हल्लेखोरांनी मोस्ट वॉन्टेड गुंड जितेंद्र मान उर्फ ​​गोगीची (Jitender Mann ‘Gogi’) गोळ्या घालून हत्या केली. त्या दरम्यान न्यायालयाच्या आवारात गोळीबाराचा थरार झाला. यावेळी हल्लेखोरही ठार झाले.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली गँगवॉरने (Delhi Gang War) हादरली आहे. दिल्लीतील रोहिणी कोर्टातच थरारक हत्याकांड झालं. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर एक गँगस्टरही ठार झाला आहे. भर दुपारी आरोपींनी वकिलाचा वेश परिधान करुन कोर्टात प्रवेश करत गोळीबार केला होता.

फिल्मी स्टाईल हत्याकांडाने दिल्ली हादरली आहे. हल्लेखोरांनी मोस्ट वॉन्टेड गुंड जितेंद्र मान उर्फ ​​गोगीची (Jitender Mann ‘Gogi’) गोळ्या घालून हत्या केली. त्या दरम्यान न्यायालयाच्या आवारात गोळीबाराचा थरार झाला. यावेळी हल्लेखोरही ठार झाले. या गोळीबारात आतापर्यंत चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक गँगस्टर जितेंद्र आहे, तर जितेंद्रवर हल्ला करण्यासाठी आलेल्या तीन हल्लेखोरांचाही समावेश आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर वकिलांच्या रूपात न्यायालय परिसरात घुसले होते. त्यांनी गुंड जितेंद्रवर गोळीबार केला. स्पेशल सेलच्या टीमने जितेंद्रला कोर्ट रूममध्ये नेले होते. तिथे हा थरारक प्रसंग घडला.

दिल्लीच्या टिल्लू टोळीने जितेंद्रची हत्या केल्याचा संशय आहे. जे हल्लेखोर ठार झाले आहेत त्यातील एकाचं नाव राहुल आहे, ज्याच्यावर 50 हजारांचे बक्षीस होते. तर दुसराही वॉन्टेड गुंड होता.