4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 27 November 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 27 November 2021

| Updated on: Nov 27, 2021 | 4:27 PM

युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (Corona New Variant) मुंबईचीही चिंता वाढली आहे. त्याची खबरदारी म्हणून दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन (Quarantine) करण्याचा विचार पालिका (BMC) करत आहे. दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे विमानसेवा बंद करण्याची कोणतेही मागणी नाही, असं स्पष्टीकरण पालिकेने दिलं आहे.

परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्यावर पालिका भर देणार आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे. युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच, या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी कोरोना टास्क फोर्सकडे केली आहे.