4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 4 October 2021
अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे.
अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून एनसीबीच्या सूत्रांनुसार ते आर्यन खान, अरबाज मर्चेट आणि मुनमुन धामेचा यांच्या एनसीबी कोठडीची आज पुन्हा मागणी करतील.
एनसीबीच्या सूत्रांनुसार आर्यन चेक इन करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. अरबाजच्या शूजच्या सोलमध्ये ड्रग्ज लपवून आणली गेली होती, जरी आर्यनच्या खिशातून किंवा पिशवीतून ड्रग्ज सापडली नसली, तरी ती ड्रग्ज फक्त आर्यन, अरबाज आणि त्यांच्या साथीदारांच्या वापरासाठी आणली गेली होती, याचा पुरावा आर्यन आणि अरबाजच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये सापडला आहे, ज्यामध्ये आर्यन अरबाज मर्चंटला ड्रग आणण्यास सांगत असल्याचे आढळून आले आहे.