4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 8 December 2021
तामिळनाडूत सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) कोसळून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी आणि रावत त्यांच्या पत्नीसह होते.
तामिळनाडूत सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) कोसळून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी आणि रावत त्यांच्या पत्नीसह होते. हेलिकॉप्टर कोसळले आणि आगीचे भीषण लोट उसळले. कित्येक दूरवरून लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. हा महाभयंकर अपघात कसा घडला, वाचा सविस्तर…
सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरण खराब आहे. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यात रावत, रावत यांच्या पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आएएफ पायलट यांचा समावेश आहे.