4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 1 November 2021
गेल्या काही महिन्यांपासून गायब असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडाच्या कार्यालयात पोहोचले आहेत. सकाळीच ते ईडी कार्यालयात दाखल झाले असून त्यांची कसून चौकशी केली जाणरा आहे. देशमुख यांची नुसती चौकशी होणार की त्यांना अटक केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या नागपूर, मुंबईतील मालमत्तांवरही टाच आणण्यात आली आहे. ईडीने त्यांना चौकशीसाठी अनेक वेळा समन्स बजावले होते. मात्र, देशमुख ईडीसमोर आले नव्हते. यंत्रणाही त्यांचा शोध घेत होती. मात्र, ते यंत्रणांनाही सापडले नाही. त्यामुळे देशमुख नक्की कुठे आहेत? असा सवाल केला जात होता. तसेच देशमुख परदेशात पळून गेल्याचीही चर्चा होती. मात्र, आज अचानक देशमुख ईडी कार्यालयात आवतरले. त्यामुळे त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जातं.