4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 30 December 2021
भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज पुन्हा कोर्टात सुनावणी होत आहे, मात्र मतदान संपल्यानंतर कणकवलीत भाजप आणि सेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आल्याचे दिसून आले. यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, शांतता राखण्यासाठी यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज पुन्हा कोर्टात सुनावणी होत आहे, मात्र मतदान संपल्यानंतर कणकवलीत भाजप आणि सेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आल्याचे दिसून आले. यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, शांतता राखण्यासाठी यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अजूनही कणकवलीत तणावाचे वातावरण आहे. कणकवलीत आज जिल्हा बँकेसाठी मतदान पार पडले आहे, यावेळी मतदान संपताच शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी सुरू केली, त्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा येथे सुरू झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा आणि शांतता राखण्याचा प्रयत्न केला, मात्र जोरदार राडा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी दंगल नियंत्रक पथकाला बोलावले. तरीही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.