Hatnur Dam | हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, धरणातून 89 हजार 488 क्युसेस वेगाने विसर्ग सुरु
या वर्षी पहिल्याच पावसाळ्यात 41 दरवाजे उघडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना हातनूर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.
जळगाव : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले असून धरणातून तापी नदीच्या पात्रात 89 हजार 488 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या वर्षी पहिल्याच पावसाळ्यात 41 दरवाजे उघडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना हातनूर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.
Latest Videos