विधानसभेच्या तोंडावर 5 कोटी जप्त, शहाजी बापूंवर आरोप मात्र कारचं कनेक्शन नेमकं कोणाशी?
खेड-शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांकडून एका कारमधून तब्बल ५ कोटी रूपये जप्त करण्यात आले. तर ही रक्कम शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर ज्या कारमधून ही रक्कम जप्त झाली आहे. त्यावरून आता ट्विस्ट निर्माण झालाय.
खेड-शिवापूर टोलनाक्यावर एका पांढऱ्या कारमधून तब्बल ५ कोटी कॅश सापडली. यानंतर विरोधकांनी आपला मोर्चा शिंदेंच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे वळवला. जे पाच कोटी रक्कम जप्त करण्यात आले त्यामध्ये ५०० रूपयांच्या नोटांसह बंद झालेल्या दोन हजार रूपयांच्या नोटांची देखील बंडलं आहेत. पोलिसांनी ही कॅश जप्त केल्यानंतर ती आयकर विभागाकडे दिली. तर ज्या कारमधून पोलिसांनी पैसे जप्त केले ती कार सांगोल्याचे अमोल नलावडे यांची असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या पैशांची आपला काहीही संबंध नसून ती कार अकोल्याचे बाळासाहेब आजबे यांना चार पाच महिन्यांपूर्वी विकल्याचे अमोल नलावडे यांनी सांगितले. तर अमोल नलावडे हे शेतकरी पक्षाचे असून दोन वर्षांपासून माझ्यासोबत शिवसेनेचे काम करत असल्याचे स्वतः शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं. अमोल नलावडे यांनी मात्र आपण कोणाचाही कार्यकर्ता नसून शहाजीबापू पाटील यांच्याशी संबंध नाही, असं म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट